प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत.लक्ष्मण हकेनी पाणी देखील सोडले आहे!!!!



         प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पहावे.

- पंकजाताई गोपीनाथ मुंडे 

समाजासाठी.....

             लढू शकत नसाल तर बोला बोलू शकत नसाल तर लिहा लिहू शकत नसाल तर साथ द्या मात्र साथ देखील देता येत नसेल तर जे लढत आहेत, लिहित आहेत, बोलत आहेत त्यांचे मनोबल वाढवा. हेही जमत नसेल तर कमीत कमी त्यांचे मनोबल खच्ची करू नका. कारण ते तुमच्या हिश्श्याची लढाई लढत आहेत.त्यांना साथ देणं खूप गरजेचं आहे .ओबीसी समाजाला फक्त एका गोष्टीची जाणीव ठेवावी की जे आपल्याला भेटलय ते फक्त टिकवून खूप गरजेचे आहे हे तेव्हा शक्य होऊ शकेल जेव्हा सर्व ओबीसी समाज एकत्र होऊन आपल्या माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभा राह त्यांची साथ द्या व त्यांच्यासोबत लढा !

        महाराष्ट्र मध्ये चाललेल्या सध्याच्या काळामध्ये मराठा व ओबीसी आरक्षण या संदर्भामध्ये मनतरंगे पाटील यांनी ओबीसी मधून आरक्षण घेण्यासाठी आतापर्यंत खूप प्रयत्न केले तरी पण त्यांना ओबीसी मध्ये पूर्णपणे येता नाही आलं कारण ओबीसींचे काही लक्ष्मण हाके यांच्यासारखे काही नेते आणखी पण आपल्या ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी जीवाचं रान करून लढत आहेत यामध्ये त्यांना आपण साथ देण्याची खूप गरजेचे आहे लक्ष्मण हाके यांनी सहकारी उपोषणाला बसून ओबीसी चे आरक्षण कुठही जाऊ नये म्हणून एक मोठा निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला व त्यांना आपण सर्वांनी साथ देणं खूप गरजेचे आहे जर आपण जर साथ नाही दिली तर आपल्या हक्काचा आरक्षण हे मराठा समाजाला जाऊ शकतो पण कायद्यापलीकडे जाऊन कोणालाही काही करता येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती चालणारे आपण सगळे लोक आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिकवतात की हक्कासाठी लढणं हे गरजेचं असतं कारण आपला हक्क आपल्याला भेटायला हवा जो हक्कासाठी लढू शकत नाही तो कुठेही जिंकू शकत नाही यासाठी सर्व ओबीसी बांधवांना माझी ही कळकळीची विनंती आहे की हा त्यांच्या या आमरण उपोषणा ला सर्वांनी मिळून ठामपणे उभे राहून त्यांना पाठिंबा द्यावा व आपण सर्व ओबीसी बांधवांनी आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी उभेकोण आहेत ओबीसी योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर...

प्राध्यापक लक्ष्मण हाके हे जुजारपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील एका धनगर मेंढपाळ कुटुंबात जन्मलेला हिरा... पोटाला अन्नाचा तुकडाही नसताना या मेंढपाळाच्या पोरांन शिक्षणाच्या भुकेसाठी शहराकडे धाव घेतली ते साल होते 1995 आणि कॉलेज होतं डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांगलीचे विलिंग्डन महाविद्यालय सांगली...

शहरात येत असताना अंगावरचे कपडे व डब्यातील अन्न सर्व काही सांगत होते दारिद्र्य काय असते गरिबी काय असते हे कोणी सांगून कळत नसतं पण ज्याला शिक्षणाची ओढ असते त्याला परिस्थितीची फिकर नसते अशा परिस्थितीवर मात करीत मराठी विषयांमध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेला एक गरीबीचे चटके सोसणारा युवक म्हणजेच लक्ष्मण हाके सर...

ते आपले ग्रॅज्युएशनचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षणासाठी पुन्हा पुण्याकडे धाव घेतली पुढील शिक्षण ही कंप्लीट केले. कवी मनाचे लक्ष्मण हाके सर सामाजिक बांधिलकी जपणारे हाके सर आज ओबीसींच्या हक्कासाठी गेली तीन ते चार वर्षांपासून संघर्ष करीत आहे त्यांचा हा संघर्ष पाहता त्यांनी केलेले कष्ट व गरीबीशी नाळ जोडलेले संस्कार अन्यायाला वाचा फोडणारा अभ्यास व सडेतोड वकृत्व या सर्वांच्या जोरावर आज लक्ष्मण हाके सर आपले कार्य करीत आहेत ते आज ओबीसीच्या न्याय हक्कासाठी बेमुदत अन्न त्याग उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांना सर्व ओबीसी समूहातून मोठा पाठिंबा मिळत आहे.. राष्ट्रीय समाज पक्षाच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता शिवसेनेच्या प्रवक्ते पदापर्यंत झेप घेतो व तो हळूहळू ओबीसींच्या वंचितांच्या हक्कासाठी आपले सर्वस्व पणाला लावतो त्यावेळी त्यांचा खरंच अभिमान वाटतो. त्यांना मागासवर्गीय आयोगावर ही त्यांच्या अभ्यासाच्या जोरावर संधी मिळते व त्याचाही ते त्याग करतात पण आपल्या ओबीसी बांधवावर कोणताच अन्याय होऊ देत नाही यातच त्यांचे मोठेपण दिसते.


जय भारत... जय संविधान...

राहायचं आहे.

    

     सकल ओबीसी समाज तलवाडा जाहीर पाठिंबा लक्ष्मण हाके यांना. अभी नही तो कभी नही जो ओबीसी की बात करेगा वही इस देश पर राज करेगा जय ओ बी सी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या