मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करु इच्छितो. अशे करा आवेदन
महत्त्वाची घोषणा!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना.
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या शासननिर्णयात केलेल्या महत्त्वपूर्ण बदलाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदन केले. की आता या योजनेत सहभागी महिलांना मुदतवाढ दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत सरकारने दिलेल्या निर्णयामध्ये सरकारने परत यामध्ये मुदत वाढ दिली आहे तरीही सर्व महिलांनी मुख्यमंत्री ही माझी काळजी बहिणी योजना या साठी लाभ घेणारे सर्व महिलांना आता सरकार देणार आहे पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला बँक खात्यामध्ये खटाखट खटाखट जमा होणार आहे तरीही सर्व महिलांना कळविण्यात येते की या योजनेच्या लाभ घेण्यासाठी सर्व महिलांनी खालील दिलेल्या प्रमाणे सर्व कागदपत्रांची जमा करून त्या योजनेचा फॉर्म भरावा व योजनेचा लाभ घ्यावा यासाठी काही अटी आहे ज्या की ही योजना फक्त या महिलांसाठी आहे जाणून घ्याखली.
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करु इच्छितो-
१. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.१ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
२. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.
३. सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.
५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.
६. रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.
७. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या